सर्वधर्म समभवाचे प्रतीक
नाशिक शहरातील देवललीच्या सातही वॉर्डात सर्वधर्मीय व बहुभाषिक राहतात. त्या -त्या धर्माचे उत्सव येथे एकीने साजरे होतात . शिंगवे बहुला अंबडवाडी गाव , लामरोड व देवळाली शहरात बजरंगबाली यात्रा , नवग्रह शनिमंदिर उत्सव सोहळा , नवरात्रोत्सव आणि त्या निमित्ताने होणारे दरदिवसीय भजन , कीर्तन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन महत्वाचे होय . लालदास स्वामींची यात्रा असो किवा खंडोबा महाराज यात्रा त्याचबरोबर लष्करी मुख्यालयाचा दुर्गा मोहत्सव ही तन्मयतेने साजरा केला जातो . राज्यभर प्रसिद्ध असलेल्या भगुर येथील रेणुकादेवी यात्रेत हजारोंच्या संखेने भाविक दर्शनासाठी येतात.
देवळाली शहरात सिंधी ही संस्थाही धार्मिक कार्यक्रम साजरे करते. यात चेत्रीचंड , भगवान झुलेलाल यांचा मोहोत्सव , रंगपंचमी - होळी (ललालोई ) तसेच श्रावणात होणारा चाळीस दिवसीय उपवास ( चालिया ) हे सिंधी समुदायाचे मुख्य सन आहेत . मुस्लिम समाजाचेही धार्मिक सन , बकरी ईद व हि पारंपारिक उत्साहात साजरे होतात . देवळालीत मुस्लिम व बोहरी समाजाच्या मशिदी आहेत . शीख धर्मियांचे गुरुद्वार असून दरवर्षी गुरुनानक व गुरुगोविंदसिहजी यांच्या स्मृत्यर्थ विविध कार्यक्रम साजरे होतात .
देवळालीच्या सर्वच धार्मिक कार्यक्रमात येथील बौद्ध धर्मियांचा सहभाग हा लक्षणीय आहे . बुद्ध पोर्णिमा व आंबेडकर जयंती निमित्त येथील ज्ञानमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम इथे होतात . शांतताप्रिय पारशी समाजाचेही येथे पारशी अग्यारी सारखे मंदिर असून दरवर्षी पतेतिसरखे सन हा समाज येथे साजरा करत आला आहे .
लामरोड भागात अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जैन बांधवानी अत्यंत सुबक आणि देखणी मंदिरे उभी केली आहेत . यात प्रामुख्याने मुनिसुव्रत मंदिर , श्रीमद राजचंद्र स्वाध्याय मंदिर , कोठारी आरोग्यधाम येथील जैन मंदिर , बालगृह रोडवरील जैन मंदिर , लामरोड येथील सौराष्ट्रीय शिल्पातील कृष्णमंदीर तसेच कहाननगर येथील शिल्पकृती आणि या सर्वच ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम भाविकांना आकृष्ट करणारे आहेत . हिंदू - मुस्लिम , शीख , इसाई , सिंधी ,बौद्ध , मातंग , बोहरी, पारशी, गुर्जर, जैन, मारवाडी, आदिवासी, वडार अशा सर्व धर्मियांचे वसतीस्थान असलेले देवळाली हे खऱ्या अर्थाने सर्वधर्मियांचे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून हे एक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे .
No comments:
Post a Comment