" चला ट्रेकिंगला "
.............................. ................
" कलाडगड "
::::::::::::::::::
" वसंत ऋतुत असते
फळांची दिवाळी,अनं
पुष्पवृक्षांचा रंगाेत्सव........!
वर्षाऋतुत दिसतात
हिरवाईचे मखमली डाेंगर , अनं
रानफुलांची नक्षी लेवुन
सजलेल्या रानवाटा,,,,,,,
हेमंतऋतुत मात्र संगत
असते गाेड गुलाबी थंडीची ,
अनं बहारदार हवामानाची.."
~~~~~~~~~~~~~~~~~
"मग चला भटकायला या आल्हाददायक वातावरणात...
" आज बाळेश्वर रांगेतला दुर्लक्षित कलाडगडाकडे निघु या. खरं तर महाराष्ट्रातली तमाम भटकि जमात हरिश्चंद्र गड़ावर ट्रेकसाठी बारमाही येतच असते.ब-याचं भटक्यांच्या तर पंढरीच्या वा-या या गड़ावर सारख्या सुरुचं असतात.पण त्यांची पावलं काही कलाडकडे वळत नाहित ..म्हणुन त्याचं अस्तित्व दुर्लक्षित गटात.."
" ट्रेकिंगच्या छंदाची धडपड फळाला येऊ लागलीय,काळ्या-कभिन्न डाेंगरांना भिडण्याची खुमखुमी अंगाच्या अणुरेणुत मस्त मुरलीय..मग आता कुठे सिमारेषा आेलांडुन भटकंतीचा वारु असा चाैफेर उधळलाय कि आनंदाच्या सिमा पार झाल्यात.सह्याद्रिच्या अंगाखांद्यावर भटकतांना निसर्गाचे कितीतरी रुप अनुभवायला मिळाली .त्याअनुरुप तर एक संपन्न आनंदयात्रा आयुष्याची लकिर बनलीय..कलाडच्या कड्यावरुन नखशिकांत सह्याद्रिचं अपार रुप बघतांना या सर्वांची जाणीव मनाचा ठाव घेऊ पहातेय.कलाडगड आहेचं तसा राजबिंडा.
त्याचं हे राजबिंडेपण अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम भंडारदरा मग पुढचं राजुर हे गांव गाठावं लागेल.तेथुन हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याचं पाचनाई गांव..पाचनाईच्या पश्चिमेला जाे टुमदार डाेंगर दिसताे ताेचं "कलाडगड" ..गावातंनचं पश्चिमेला पेठेचीवाडी कडे जाणा-या रस्त्याने जात कलाडच्या उत्तरेच्या पायथ्याशी पाेहचायचं .तिथुनचं एक पायवाट दक्षिणबाजुने गडाच्या दिशेने जाते.
मग थेट खडी चढाईचं सुरु हाेते..काहि वेळानंतर माथ्यावर जाईं पर्यंत तीन ठिकाणी खड्या चढाईचे कातळ-टप्पे लागतात.अगदिचं अंगावर येणा-या चढाईला मात्र कातळ-काेरिव खाेबण्यामुळे दिलासा मिळताे तर ,काहि ठिकाणी पाय ठेवण्या एवढे कातळ टप्पे आहेत.पण चढाई खराेखरीचं धमालची आहे..हे थरारक दिव्य पार करुन आपण माथ्याच्या टप्यावर येताे.तिथचं गुहेत भैराेबाचं स्थान आहे,तर बाजुला देवीचं मंदिरही आहेचं.अनं शुध्द पाण्याचा झराही..प्रती-वर्षी अश्विन महिन्यात येथे जत्राही भरते.तेथुनचं उत्तरेला दुरवर शिरपुज्याचा भैरवगड,घनचक्कर,मुडा,कात्रबाई, आजाेबा हे महाकाय डाेंगर बघत छाती दडपुन जाते.सर्व सिनेमास्काेप नजराणा नजरेच्या पटलात बंदिस्त करत, दक्षिणेला निघायचं ते गडाच्या पुर्व बाजुने.पुढे मार्गात उजव्या बाजुला काही काेरडे टाके दिसतात. तर दक्षिण भागात एक जाभुळवृक्ष "अकेले हम"च्या स्थितप्रज्ञ अवस्थेत.पुढ्यात वेताळाचे ठाणे आहे.बाकि खुपअशी झाड नाहितच.माथ्यावरुन मात्र चारही बाजुंचा सह्याद्रिचा अफाट गाेतावळा अचंबित करताे.पुर्वेला हरिश्चंद्र गड त्या पलिकडे काेथळ्याचा भैरवगड,कुंझरगड,तर पश्चिमेला कुमशेतचा काेंबडा,नाफ्ता,दक्षिणेला दुरवर माळशेज घाट व परीसरातले गड-किल्ले/डाेंगरमाथे नजरेत सामावतात.चाैफेर भटकुन उत्तरेच्या माथ्यावर जायचं. पुन्हा सर्व भरदार विहंगम न्याहळत परतीला निघायचं.अन्य गड/किल्या सारखे इथं तट-बुरुज वा कुठलेही लक्षवेधी बांधकाम दृष्टीस पडत नाही.तरी कलाड भटकंती खराेखरीचं चिरस्मरणीय ठरते...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~
" कलाडगड "
पायथ्याचं गांव :: पाचनाई
नाशिकहून अंतर : १३३ किमी.
रांग :: बाळेश्वर
उंची :::३६०८ फुट
नाशिकपासुन अंतर :::
चढाई श्रेणी ::: मध्यम
..............................
" कलाडगड "
::::::::::::::::::
" वसंत ऋतुत असते
फळांची दिवाळी,अनं
पुष्पवृक्षांचा रंगाेत्सव........!
वर्षाऋतुत दिसतात
हिरवाईचे मखमली डाेंगर , अनं
रानफुलांची नक्षी लेवुन
सजलेल्या रानवाटा,,,,,,,
हेमंतऋतुत मात्र संगत
असते गाेड गुलाबी थंडीची ,
अनं बहारदार हवामानाची.."
~~~~~~~~~~~~~~~~~
"मग चला भटकायला या आल्हाददायक वातावरणात...
" आज बाळेश्वर रांगेतला दुर्लक्षित कलाडगडाकडे निघु या. खरं तर महाराष्ट्रातली तमाम भटकि जमात हरिश्चंद्र गड़ावर ट्रेकसाठी बारमाही येतच असते.ब-याचं भटक्यांच्या तर पंढरीच्या वा-या या गड़ावर सारख्या सुरुचं असतात.पण त्यांची पावलं काही कलाडकडे वळत नाहित ..म्हणुन त्याचं अस्तित्व दुर्लक्षित गटात.."
" ट्रेकिंगच्या छंदाची धडपड फळाला येऊ लागलीय,काळ्या-कभिन्न डाेंगरांना भिडण्याची खुमखुमी अंगाच्या अणुरेणुत मस्त मुरलीय..मग आता कुठे सिमारेषा आेलांडुन भटकंतीचा वारु असा चाैफेर उधळलाय कि आनंदाच्या सिमा पार झाल्यात.सह्याद्रिच्या अंगाखांद्यावर भटकतांना निसर्गाचे कितीतरी रुप अनुभवायला मिळाली .त्याअनुरुप तर एक संपन्न आनंदयात्रा आयुष्याची लकिर बनलीय..कलाडच्या कड्यावरुन नखशिकांत सह्याद्रिचं अपार रुप बघतांना या सर्वांची जाणीव मनाचा ठाव घेऊ पहातेय.कलाडगड आहेचं तसा राजबिंडा.
त्याचं हे राजबिंडेपण अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम भंडारदरा मग पुढचं राजुर हे गांव गाठावं लागेल.तेथुन हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याचं पाचनाई गांव..पाचनाईच्या पश्चिमेला जाे टुमदार डाेंगर दिसताे ताेचं "कलाडगड" ..गावातंनचं पश्चिमेला पेठेचीवाडी कडे जाणा-या रस्त्याने जात कलाडच्या उत्तरेच्या पायथ्याशी पाेहचायचं .तिथुनचं एक पायवाट दक्षिणबाजुने गडाच्या दिशेने जाते.
मग थेट खडी चढाईचं सुरु हाेते..काहि वेळानंतर माथ्यावर जाईं पर्यंत तीन ठिकाणी खड्या चढाईचे कातळ-टप्पे लागतात.अगदिचं अंगावर येणा-या चढाईला मात्र कातळ-काेरिव खाेबण्यामुळे दिलासा मिळताे तर ,काहि ठिकाणी पाय ठेवण्या एवढे कातळ टप्पे आहेत.पण चढाई खराेखरीचं धमालची आहे..हे थरारक दिव्य पार करुन आपण माथ्याच्या टप्यावर येताे.तिथचं गुहेत भैराेबाचं स्थान आहे,तर बाजुला देवीचं मंदिरही आहेचं.अनं शुध्द पाण्याचा झराही..प्रती-वर्षी अश्विन महिन्यात येथे जत्राही भरते.तेथुनचं उत्तरेला दुरवर शिरपुज्याचा भैरवगड,घनचक्कर,मुडा,कात्रबाई,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
" कलाडगड "
पायथ्याचं गांव :: पाचनाई
नाशिकहून अंतर : १३३ किमी.
रांग :: बाळेश्वर
उंची :::३६०८ फुट
नाशिकपासुन अंतर :::
चढाई श्रेणी ::: मध्यम
No comments:
Post a Comment